By  
on  

पाहा Video : 'बिग बॉस मराठी 3' चा नवा प्रोमो प्रदर्शित, या दिवसापासून Entertainment Unlock होणार

मोठ्या प्रतिक्षेनंतर आता मराठी बिग बॉसचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाचं हे तिसरं पर्व आहे. पहिल्या प्रोमोनंतर आता या कार्यक्रमाचा दुसरा नवा प्रोमोदेखील लक्षवेधी ठरतोय. या कॉमेडी प्रोमोमधून बिग बॉस मराठीसाठी इतरही प्रेक्षक किती उत्सुक असतील हे लक्षात येतय. 

नव्या प्रोमोतही या कार्यक्रमाची सुपर होस्ट महेश मांजरेकर पाहायला मिळतय. महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या दोन सिझनचं सूत्रसंचालन केलय. आता तिसऱ्या सिझनसाठीही ते सज्ज झाले आहेत. तेव्हा 'बिग बॉस मराठी 3' मध्ये आता कोण स्पर्धक पाहायला मिळतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. येत्या 19 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

 

हिंदीसह विविध भाषेत या कार्यक्रमाला यश मिळाल्यानंतर मराठीतही हा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. ज्यात अभिनेत्री मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती ठरली होती. तर शिव ठाकरे हा बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता ठरला होता. दोन्ही सिझन हे यशस्वी आणि मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले होते. आता तिसऱ्या सिझनमधूनही हा कार्यक्रम प्रेक्षकांची पसंती मिळवेल यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive