बिग बॉस मराठी 3 Day 1 : पहिल्याच दिवशी घरात मिरा जगन्नाथचा जय दुधाणे आणि स्नेहा वाघसोबत वाद

By  
on  

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन नुकतच सुरु झालय. ग्रँड प्रिमियरनंतर कशी असेल बिग बॉस मराठीच्या घरातील पहिल्या दिवसाची सुरुवात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातच पहिल्या दिवसाच्या काही खास अपडेट्स समोर आल्या आहेत. 15 स्पर्धक आता बिग बॉस मराठी 3 घरात गेले आहेत. इथे 100 दिवस विविध अडचणींना सामोरं जात कोण हा खेळ उत्तम खेळणार हे पाहायला मिळणार आहे. 

पहिल्याच दिवशी सकाळी बिग बॉस मराठीच्या घरात वादाची ठिणगी पेटली आहे. स्पर्धक मिरा जगन्नाथने पहिल्याच दिवशी सकाळी घरात वाद केलाय. टॉवल बेडवर ठेवल्यामुळे मिराने जय दुधाणेची शाळा घेतली. बेडरुममध्ये जयने त्याचा टॉवल बेडवर ठेवला होता. हे पाहुन मिराने तो टॉवल उचलण्यासाठी त्याला सांगितला. मिराचं बोलण जयला खटकलं आणि टॉवल उचलून तो मिरावर चिडला. मिरानेही पुन्हा प्रतिउत्तर देत वाद निर्माण केला.

एवढच नाही तर मिराचा स्नेहा वाघसोबतही वाद झाला. किचन ड्युटीवरुन मिराने स्नेहाला खडेबोल सुनावले. स्नेहाने मिराला समजावण्याचा प्रयत्न केला पण मिराने वाद आणखी वाढवला. 

बिग बॉस मराठीच्या घरात वादविवाद तर होतातच. पण यावेळी सिझन 3 मध्ये पहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पाहायला मिळाली. मिरा ही मॉडेल, अभिनेत्री असून आत्तापर्यंत विविध मालिकांमधून ती झळकली आहे.  तेव्हा या सगळ्या गोष्टी बिग बॉस मराठी 3 च्या पहिल्याच भागात पाहायला मिळणार आहेत. 

Recommended

Loading...
Share