Bigg Boss Marathi 3 Day 3 : टास्क दरम्यान मीरा जगन्नाथच्या वागण्यामुळे रडला जय दुधाणे ?

By  
on  

बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व हे मागील दोन सिझनपेक्षा अत्यंत वेगळं असल्याचं पाहायला मिळतय. कारण बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासूनच राडा सुरु झाला आहे. पहिल्याच दिवसापासून भांडणं, एकापेक्षा एक टास्क पाहायला मिळत आहेत. यात काही टास्क दरम्यान स्पर्धकांची चांगलीच कसरत होताना दिसतेय. 

नुकत्याच दिलेल्या एका टास्क दरम्यान जय दुधाणे आणि मीरा जगन्नाथ एकत्र हा टास्क करताना दिसतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या या टास्कच्या प्रोमोमधून काहीतरी वेगळच पाहायला मिळतय.

या टास्क दरम्यान मीरा जयच्या पाठीवर बसून त्याला घरभर फिरवतेय. जयचे पाय दुखू लागले तरी मीरा काही थांबेना असं या प्रोमोतून पाहायला मिळतय. मात्र पुढे असं काही होतं की ज्यामुळे जय दुधाणे रडायला लागतो. काय आहे जयच्या रडण्याचं कारण ? मीराच्या कोणत्या वागण्यामुळे जय दुखावला ? नेमकं या टास्क दरम्यान काय घडलं ? यासाठी बिग बॉस मराठी 3 चा नवा भाग पाहावा लागेल. 

Recommended

Loading...
Share