बिग बॉस मराठी 3 Day 3 : शिवलीलाला अश्रु अनावर, मीनलसोबत बोलताना झाली भावुक

By  
on  

बिग बॉस मराठी 3 ची धमाकेदार सुरुवात झालेली पाहायला मिळतेय. पहिल्याच दिवसापासून विविध टास्कनी घरात रंगत आणली आहे. स्पर्धकांनी कंबर कसली आहे आणि मिळेल तो टास्क करण्यासाठी ते सज्ज दिसत आहेत. यातच काही स्पर्धक अजूनही घरात खुलून दिसत नाहीत. त्यापैकीच एक आहे शिवलीला पाटील. शिवलीघला ही तरुण किर्तनकार असून बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून दिसतेय. पहिल्या दिवसापासून स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देताना दिसत आहेत. मात्र शिवलीलाला या सगळ्यात कसं वागावं हे कळत नाहीये.

नुकतच मीनल शाहसोबत गप्पा मारत असताना शिवलीलाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी बोलताना ती भावुक झालेली दिसणार आहे.

शिवलीला मीनलला म्हणते की, "“आईला बघताना कसे वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये”. त्यावर मीनलने तिला समजावले की “तू खूप छान वागते आहेस. चांगलं खेळते आहेस. तुझी मतं क्लिअर आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत." असं म्हणत मीनलने शिवलीला मिठी मारली आणि शिवलीला भावुक झाली. त्यावेळी उपस्थित विशाल निकम देखील म्हणाला की “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात”.
 
 

Recommended

Loading...
Share