Bigg Boss Marathi 3 Day 3 : उत्कर्ष शिंदेसह इतर स्पर्धक टास्कसाठी अशी करत आहेत स्ट्रॅटेजी

By  
on  

बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन नुकतच सुरु झालय. यात स्पर्धकांना पहिल्याच दिवसापासून विविध टास्क मिळाले आहेत. नॉमिनेशन टास्क झाल्यानंतर आता स्पर्धकांना काही साप्ताहिक टास्क देण्यात आलाय. यापैकी  'चिऊ ताई चिऊ ताई दार उघड' या टास्कसाठी घरातील सगळेच सदस्य खूप कष्टाने महिला सदस्यांना विनवणी करताना दिसले. ज्यामध्ये उत्कर्ष हा तृप्ती देसाई यांना सांगताना दिसला की, “जर मी हा गेम जिंकलो तर मी तुमच्या लोकांना मदत करणार जे माझ्या जवळचे आहेत. तुम्हाला माहिती आहे इथे जी मुलं आहेत ते वेगळ्या टीममध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे जर मी जिंकलो तर पुढच्या टास्कला मी तुमच्या लोकांना म्हणजेच तुम्ही, शिवलीला तुम्हाला माहिती आहे कोण कोण त्यांना मी साथ देईन… तुम्ही तुमचा पण विचार केला पाहिजे जर टिकायचे आहे तर, विचार करा”.

तर दुसरीकडे उत्कर्ष हा गायत्रीशी देखील बोलताना दिसला, “आपल्या टीममधून माझ्याकडे एक पॉइंट आलेला आहे आणि जर मला अजून एक पॉइंट मिळाला तर मी आपल्या टीमला स्ट्रॉंग करू शकतो”.  त्यामुळे घरात उत्कर्ष टास्क जिंकण्यासाठी विविध स्ट्रँटेजी करताना दिसतोय.


 
तर दुसरीकडे, मीनल विशाल, विकास, सोनाली यांना समजविण्याचा प्रयत्न करतेय.  ती सांगतेय की “ बझर झाल्यानंतर जय आणि विकास आला त्यांनी मुद्दा सांगितला आणि निघाले कारण दुसर्‍याला चान्स मिळायला पाहिजे.पण जेव्हा आविष्कार आणि उत्कर्ष आले त्यांनी खूप वेळ घेतला. मीनल विशाल सांगणार आहे तू दादुस आणि अक्षयला सांग तुम्ही बाहेर येऊच नका जोवर बझर होत नाही. जर अक्षय आणि दादुस अडून राहिले आम्ही बाहेरच नाही येणार तर खरी गंमत येईल”.

अशाप्रकारे स्पर्धक टास्क जिंकण्यासाठी विविध स्ट्रॅटेजी करताना दिसत आहेत. तेव्हा या टास्कमध्ये पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
 
 

Recommended

Loading...
Share