बिग बॉस मराठी 3 : बिग बॉसच्या घरात एकटं फिरण्यावर बंदी ?

By  
on  

बिग बॉस मराठी 3 चा पहिला आठवडा पार पडलाय. पहिल्याच आठवड्यात बरेच वाद झाले, टास्क झाले आणि मैत्रीही झाली. विकएन्डला चावडीवर महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळाही घेतली. मात्र आता हा आठवडा या स्पर्धकांसाठी कसा असेल हे पाहणं रंजक ठरणार आहे. या आठवड्यात मात्र एलिमिनेश होणार असल्याने स्पर्धकांनी कंबर कसलीय.

यातच स्पर्धकांना एक नवा टास्क मिळणार आहे. या टास्कमध्ये त्यांना एकटं फिरण्यावर बंदी असणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्यासोबतचा जोडीदार शोधावा लागणार आहे. मात्र जोडीदार निवडल्यानंतर त्याच जोडीदारासोबत त्यांना आठवडा काढावा लागणार आहे. हा टास्क मिळताच स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळतेय.

त्यामुळे या टास्कमध्ये कोणत्या जोड्या पाहायला मिळतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या टास्कमुळे घरात वादाची ठिणगी पेटेले का हे देखील पाहायला मिळणार आहे. 

या टास्कमुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण बदलेलं पाहायला मिळेल. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच मिळालेला हा टास्क स्पर्धकांसाठी कोणते अडथळे घेऊन येईल हे या आठवड्यात समोर येईलच.

Recommended

Loading...
Share