बिग बॉस मराठी 3 Day 6 : स्पर्धकांना मिळाला नवा टास्क - जोडी की बेडी

By  
on  

नुकतीच बिग बॉस मराठी 3 ची पहिली चावडी रंगली. महेश मांजरेकरांनी काही सदस्यांची कानघडणी केली, काहींना शाबासकी मिळाली. मीराला, गायत्रीला त्या कुठे चुकत आहेत हे सांगितले. काही सदस्य घरामध्ये दिसत नसून त्यांनी सुरू होणार्‍या आठवड्यात त्यांचे मत मांडावे असे सांगितले. आता सुरू झाला आहे नवा आठवडा. नव्या आठवड्यामध्ये रंगणार नवा टास्क.

'जोडी की बडी' या आठवड्याची थीम असून, या थीमच्या अंतर्गत नवा टास्क रंगणार आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे, बिग बॉस यांनी बिग बॉस मराठीच्या घरात एकटं फिरण्यास सदस्यांना बंदी केली आहे. इथून पुढे संपूर्ण आठवडाभर नेमून दिलेल्या जोडीदारासोबतच पूर्ण वेळ सदस्यांना खेळ खेळावा लागणार आहे असं बिग बॉस यांनी जाहीर केले. आणि हे ऐकताच सदस्यांचे चेहरे पडले. आता या जोड्या कोणत्या असणार ? या टास्कमध्ये नक्की काय घडणार ? हे कळणार आहे आजच्या भागामध्ये.
 
 
या आठवड्यात कोणाचा आवाज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घुमणार ? कोण गाजवणार हा आठवडा ? कोण नॉमिनेशनमध्ये जाणार ? कोण होणार सेफ ? हे पुढील भागांमधून समोर येईलच.

Recommended

Loading...
Share