बिग बॉस मराठी 3 : गायत्री दातारच्या बाजुने खेळणार विकास पाटील ?

By  
on  

बिग बॉसच्या घरात कोण कुणाच्या बाजुने खेळेल हे कधीच सांगता येत नाही. असचं चित्र यंदाच्या सिझनमध्ये पाहायला मिळतय. सध्या घरात दोन ग्रुप झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र काही स्पर्धक असे आहेत जे दोन्ही ग्रुपसोबत चर्चा करताना दिसतात. यापैकीच एक विकास पाटील असल्याचं जाणवतय.

विकास नुकताच गायत्री दातारसोबत चर्चा करताना दिसलाय. यावेळी गायत्रीने विकासला “तू आमच्याकडून खेळणार आहेस की नाही”? असा प्रश्नही विचारलाय. आणि विकासमध्ये एक चर्चा बराच काळ रंगणार आहे. ज्यामध्ये विकास गायत्रीला सांगताना दिसणार आहे, “बघूया आता काय होत, त्यांच्या डोक्यात काय चालू आहे ? की त्यांना वेगळया दोन टीम तयार करायच्या आहेत ? आणि जर ते तसं करणार आहेत तर कुठल्या पध्दतीने होणार आहे ? जेव्हा ते समजेल तेव्हा पिक्चर क्लियर होईल. आणि या सगळ्यात आपल्या दोघांमधलं जे पर्सनल बॉंडिंग आहे ते अजिबात बदलणार नाही, हा मी तुला शब्द देतो."

गायत्रीने प्रश्न विचारताच त्यावर विकास म्हणाला “मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे." तेव्हा गायत्री आणि विकासच्या मैत्रीला सुरुवात झाल्याचं चित्र बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळेल. काय असेल यात दोघांची नवी स्ट्रॅटेजी हे पाहणं रंजक ठरेल. 

 
 

Recommended

Loading...
Share