बिग बॉस मराठी 3 Day 7 : स्पर्धकांमध्ये होणार हल्ला बोल, कोण हार पत्करणार ?

By  
on  

नुकताच बिग बॉस मराठी 3 चा दुसरा आठवडा सुरु झालाय. दुसऱ्याच आठवड्यात स्पर्धकांना आणखी एक नवा टास्क देण्यात आलाय. जोडी की बेडी ही आठवड्याची थीम असून बिग बॉस यांनी सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आहेत. आता आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच रहाणे अनिवार्य असणार आहे. नुकतच बिग बॉस यांनी सदस्यांनवर 'नावं मोठे लक्षण खोटे' हे नॉमिनेशन कार्य सोपावले. ज्यामध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत जय, गायत्री, विशाल, विकास, आविष्कार, मीनल आणि शिवलीला हे स्पर्धक नॉमिनेट झाले. विविध टास्कनंतर जो टास्क प्रत्येक सिझनमध्ये प्रचंड वाद निर्माण करतो तो टास्क अखेर या सिझनमध्येही देण्यात आलाय. 

मात्र यंदा कोणती खूर्ची नाही तर बाईकवर बसून नॉमिनेट असलेल्या जोडीला हा टास्क करावा लागणार आहे. 'हल्ला बोल' असं या टास्कचं नाव आहे. आजच्या सातव्या दिवसाच्या भागात हा टास्क बघायला मिळेल. 
 एका टीम मधील दोन सदस्य त्या मोटर बाईक वर बसणार आहेत आणि दुसर्‍या टीममधील सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रोमोमध्ये मोटर बाईकवर बसलेली पहिली जोडी आहे सोनाली आणि सुरेखा कुडची तर दुसरी जोडी आहे विशाल आणि विकास. या बसलेल्या सदस्यांवर पाण्याचा मारा होताना दिसतो आहे, धूर देण्यात येत आहे. म्हणजेच त्यांना त्या मोटर बाईकवरुन उतरवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येणार आहे.

या टास्कमध्ये कोण बाजी मारणार ? घरात टिकून राहण्यासाठी कोण संयम दाखवणार ? स्पर्धकांना बाईकवरुन उठवण्यासाठी स्पर्धक काय काय प्रयत्न करणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.


 

Recommended

Loading...
Share