By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 7 : नॉमिनेट झालेल्या सदस्यांना बिग बॉसने दिली व्यक्त होण्याची संधी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नाव मोठे लक्षण खोटे या पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले आहे. नॉमिनेट झालेल्या सदस्यांना वाटू शकते की त्यांचे योगदान अधिक आहे आणि याचसाठी त्या सदस्यांना व्यक्त होण्याची संधी बिग बॉस यांनी दिली.

सुरक्षित सदस्यांपैकी कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला हवा होता हे कारणांसहीत सांगायचे आहे असे जाहीर केले. याच कार्यामध्ये स्नेहा आणि मीनल मध्ये भांडण झाले. आज जय, विकास आणि शिवलीला त्यांची मते मांडताना दिसणार आहेत.


 
जय म्हणाला की, “सोनाली मी तुझं नाव घेईन, तू खूप स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेस. तू मला खेळात मात देशील आणि मी म्हणून मी तुला घाबरतो. मी मस्ती नाही करत आहे मी खरं बोलतो आहे. मी तुला स्पर्धक म्हणून घाबरतो असं मी तुला तोंडावर सांगतो."  तर या प्रक्रियेत विकासने स्नेहाचे नावं घेतले.


 
शिवलीला पाटील म्हणाली की, “ मला मान्य आहेत सगळ्या गोष्टी. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल. बिग बॉसचं घर हे फक्त भांडणाचं घर आहे, इथे फक्त काड्या, कुचर्‍या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं.  पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले ना तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन ना त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल”.


 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive