11 वर्षांनी लहान असलेल्या या अभिनेत्यासोबत जोडलं गेलं होतं 'बिग बॉस मराठी 3' ची स्पर्धक स्नेहा वाघचं नाव

By  
on  

बिग बॉस या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वाद आणि स्पर्धकांचे खासगी आयुष्य समोर येत असतं. असचं झालय अभिनेत्री स्नेहा वाघच्या बाबतीत. बिग बॉस मराठी 3 मध्ये स्पर्धक म्हणून दिसणाऱ्या स्नेहा वाघच्या खासगी आयुष्याविषयी बऱ्याच चर्चा होऊ लागल्या आहेत. यातच स्नेहाचा पहिला पति आविष्कार दार्वेकरही या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून आहे. त्यामुळे एक्स पतिसोबत एकाच छताखाली स्नेहाला बिग बॉसचा खेळ खेळावा लागतोय. त्यामुळे स्नेहाच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा होऊ लागल्या आहेत.. शिवाय स्नेहाचा दुसरा पति अनुराग सोलंकी सोशल मिडीयावर विविध स्टेटमेंट देताना दिसत आहे.

स्नेहाचा संसार दोनदा मोडलाय ज्याला अनेक वर्षे लोटली. खासगी आयुष्यात चढ-उतार पाहिलेली स्नेहा आता बिग बॉसच्या घरात शिरल्यावर या गोष्टी पुन्हा समोर येऊ लागल्या आहेत. यातच आणखी एका नावाची चर्चा होऊ लागलीय. ते नाव म्हणजे फैजल खान. स्नेहा आणि फैजलने एका मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यामुळे दोघांची चांगली मैत्री आहे. मात्र या मैत्रीला रिलेशनचं नाव देण्यात आलं होतं.

फैजल हा स्नेहापेक्षा तब्बल 11 वर्षांनी लहान आहे. मात्र जेव्हा फैजलचा त्याची गर्लफ्रेंड मुस्कानसोबत ब्रेकअप झालं तेव्हा तिने स्नेहासोबतच्या त्याच्या रिलेशनला जबाबदार ठरवलं होतं. मात्र या आरोपानंतर स्नेहाने फैजलसोबत मैत्री आणि कुटुंबासारखं नातं असल्याचं म्हटलं होतं. सोशल मिडीयावरही फैजल आणि स्नेहाचे फोटो मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते.

शिवाय दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. फैजल हा डान्सर आणि अभिनेता असून विविध रिएलिटी शो आणि हिंदी मालिकांमध्ये त्यानं काम केलय.

वयाच्या 19 वर्षी स्नेहाचा विवाह अविष्कार दार्वेकरसोबत झाला होता. मात्र काही वर्षातच ते विभक्त झाले होते. स्नेहाने अविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. तर सात वर्षांनी स्नेहाने अनुराग सोलंकीशी लगीनगाठ बांधली होती. मात्र हा संसारही फार काळ टिकला नाही. कारण आठ महिन्यातच दोघे वेगळे झाली. स्नेहाने अनुरागवर छळ केल्याचे आरोप एका मुलाखतीत केले होते. ज्यामुळे स्नेहा बिग बॉस मराठीच्या घरात जाताच अनुरागने सोशल मिडीयाच्या माध्यमातून या आरोपाचे पुरावे मागितले आहेत. 

बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहा हळूहळू खुलताना दिसत आहे. कोणत्याही ग्रुपचा भाग न होता स्नेहा तिचा खेळ खेळतेय. मात्र घराबाहेर तिच्या खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या चर्चांविषयी कळताच तिच्या काय प्रतिक्रिया असतील, तिच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतील का हे बिग बॉस मराठीच्या पुढील भागांमधून समोर येईल. 

Recommended

Loading...
Share