बिग बॉस मराठी सिझन 3 चा सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. पहिल्या आठवड्यापासून बिग बॉसच्या घरात राडा सुरुय. यातच बिग बॉसने स्पर्धकांना एक नवा टास्क दिलाय. या टास्कमध्ये दोन गट करण्यात आलेत. हल्ला बोल असं या टास्कचं नाव असून बिग बॉसच्या घरात जे गट पडले आहेत तशीच विभागणी बिग बॉसने केली त्यामुळे या टास्क दरम्यान अनेक वाद झाले. याशिवाय बिग बॉसने नेमून दिलेल्या जोडीदारासोबत राहून स्पर्धकांना आठवडाभरातील टास्क करायचे आहेत.
सोनाली आणि सुरेखा यांच्यानंतर विशाल निकम आणि विकास पाटीलने या टास्कमध्ये प्रवेश केला. ज्यानंतर साबण, पाणी, शॅम्पू, अंडी अशा विविध वस्तूंचा मारा त्यांच्यावर करण्यात आला. फक्त एवढच नाही तर दुसऱ्या गटातील गायत्री, मीरा, स्नेहा आणि जय यांचे टोमणेही ऐकावे लागले. मात्र हे सहन न झाल्याने विकासने दुसऱ्या गटातील मीरा आणि गायत्रीला खुलं चॅलेंज दिलं. दुसऱ्या राउंडमध्ये दोघींनी पहिलं बसून दाखवावं असं त्याने चॅलेंज दिलं.
मात्र विशाल आणि विकास यांनी टास्कमधून माघार घेतली नाही. या टास्कमध्ये पुढे काय होतय हे आजच्या आठव्या दिवसाच्या भागात पाहायला मिळणार आहे.
सुरुवातीला सोनाली पाटील आणि सुरेखा कुडची यांची जोडी या टास्कसाठी पुढे आल्या होत्या.. जिथे बाईक आणि बाजुला जोडलेल्या सिटवर दोघांना बसायचं होतं. दोघं बसताच साबणाचे पाणी, मिर्चीची धुरी अशा विविध गोष्टींचा मारा त्यांच्यावर करण्यात आला. मात्र सुरेखा कुडची यांना या गोष्टींचा त्रास झाला आणि त्यांनी उठायचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत सोनालीला देखील उठावं लागलं.