By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 8 : टास्कदरम्यान स्नेहा वाघचा आविष्कारला टोमणा

बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझनचा दुसरा आठवडा नुकताच सुरु झालाय. यातच बिग बॉसने स्पर्धकांना जोड्यांमध्ये विभागलय. प्रत्येक स्पर्धकाला एक जोडीदार देण्यात आलाय. या जोडीदारांसोबतच स्पर्धकांना आठवडाभर टास्क करायचे आहेत. याशिवाय नव्या टास्कमध्ये दोन गट पाडण्यात आलेत. हल्लाबोल असं या टास्कचं नाव असून या टास्कमध्ये स्पर्धकांनी अक्षरक्ष: राडा केलाय.

पहिल्याच फेरीला सोनाली पाटील आणि सुरेखा कुडची बाईकवर बसले आणि या टास्कला सुरुवात केली. या दोघी उठल्यानंतर त्यांच्या टीमकडून विशाल निकम आणि विकास पाटील बाईकवर बसले आहेत. मात्र या दोघांवर पाणी, साबण, अंडी या सगळ्या गोष्टींचा मारा सुरुच होता.

या टास्कमध्ये विकास आणि विशालला बाईकवरून उठवण्यासाठी विरुध्द टीमचे भरपूर प्रयत्न सुरू आहेत. टास्कदरम्यान आविष्कार हा विकास आणि विशालला धीर देताना दिसणार आहे, “मी रेडी आहे खेळायला, पण आता तुम्हाला खेळायचे आहे." त्यावर स्नेहा आविष्कारला उद्देशून बोलताना दिसणार आहे “जो माणूस स्वत:चा नाही तो तुमचा काय होणार”? आता स्नेहाच्या या टोंबण्यावर आविष्कार काय उत्तरं देणार ? त्यांच्यामध्ये वाद होणार का? हे आजच्या आठव्या दिवसाच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive