By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 8 : सोनाली पाटीलने विशालसोबत शेयर केली ही गोष्ट, म्हणते "ही बाई शहाणी नाहीये, मेन्टल टॉर्चर करते"

बिग बॉसचं घर आहेच असं जिथे कधीही काहीही होऊ शकतो. गेम कसा बदलेल कुणालाच कळत नाही. असच यंदाच्या सिझनमध्येही पाहायला मिळतय. या घरामध्ये कधी कधी सदस्यांना कळत नाही नक्की कसं वागावं, कोणावर विश्वास ठेवावा, कोण आपल्या बाजूने बोलतं आहे. अशावेळी ग्रुपमधले सदस्य, घरातील मित्र काही मोलाचा सल्ला देतात ज्यामुळे पुन्हा एकदा उभारी येते. तसंच काहीसं आज देखील होणार आहे. आज विशाल, सोनाली आणि मीनल याबद्दलचं बोलताना दिसणार आहेत. ज्यामध्ये विशाल सोनालीला मोलाचा सल्ला देणार आहे.  

हल्लाबोल टास्कमध्ये मीरा, गायत्री, जय यांची टीम दुसऱ्या सोनाली, विशालच्या टीमला टक्कर देताना दिसली. त्यावेळी सोनाली शांतपणे टास्क करत होती. मात्र तिच्या मनातील गोष्ट तिने विशालसमोर मांडली आहे.
सोनाली विशालला सांगणार आहे, “टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये. मेंटल टॉर्चर करते."

तर यावर विशालने सोनालीला सल्ला दिलाय की, “तू नको होऊस. तू कोणालाही बांधील नाहीयेस. तुला अक्कल आहे का? टास्कमध्ये तुझं काम होतं तिकडच्या पोरांना खिळवून ठेवायला हवं होतंस. सगळेजण तिच्यावर भिडत होते. आम्हाला माहिती आहे तुझी मेंटल परिस्थिति काय आहे. आम्ही समजून घेऊ. पण बाहेर प्रेक्षकांना काय दिसत असेल सोनाली पाटीलने पहिल्या आठवड्यात नखरे केले आणि दुसर्‍या आठवड्यात फूल डाऊन. तू मध्ये कुठेच दिसत नाहीस. तुला जोडी दिल्यापासून तू... विकासला देखील तुला हेच सांगायचं आहे. मी काळजीपोटी सांगतो आहे. ही कोणाची नाही... तुला कळलं आहे ना मग काही फरक पडत नाही”.

आता सोनाली, विशाल आणि मीनल मध्ये सुरु असलेली ही चर्चा नेमकी कुणाबद्दलची आहे हे बिग बॉस मराठीच्या आठव्या दिवसाच्या आजच्या भागात पाहायला मिळेल.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive