By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 9 : जय - गायत्रीला बाईकवरून उठवण्यासाठी विशाल - विकासने त्यांच्या अंगावर ओतलं बादलीभर पाणी

बिग बॉस मराठी सिझन 3 मध्ये स्पर्धकांना दुसऱ्या आठवड्यातच कठीण टास्क मिळालाय. हल्लाबोल असं या टास्कचं नाव असून या टास्कमध्ये दोन गट पाडण्यात आलेत. एका गटातून सोनाली, सुरेखा यांनी हार पत्करल्यानंतर विशाल आणि विकास शेवटपर्यंत बाईकवर बसून राहिले. त्यांना उठवण्यासाठी दुसऱ्या गटाने विविध प्रयत्न केले होते. साबण, पाणी, अंडी अंगावर टाकून शब्दांचा माराही केला. मात्र ते काही उठले नाहीत. त्यामुळे टीमसाठी खेळून विशाल आणि विकासने बाजी मारली.

तर आता दुसरीकडे दुसऱ्या गटातून जय दुधाणे आणि गायत्री दातार ही जोडी बाईकवर बसणार आहेत. आता या दोघांना बाईकवरून उठवण्यासाठी विशाल - विकासची टीम विविध प्रयत्न करताना दिसतील.

बिग बॉस मराठीच्या घरात नवव्या दिवशी हल्लाबोल टास्कची ही दुसरी फेरी पाहायला मिळणार आहे.

यावेळी जय आणि गायत्रीला उठवण्यासाठी विशाल-विकासने बादलीभरून साबणाच्या पाण्याचा मारा दोघांवर केलाय. मात्र जय - गायत्रीने सुरुवातीपासूनच चेहरा नीट झाकून घेण्याची स्ट्रॅटेजी केलेली दिसत आहे. तेव्हा पाण्याच्या माराने जय आणि गायत्री हार पत्करतील का. हल्लाबोल टास्कमध्ये कोणती टीम ठरेल विजयी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive