बिग बॉस मराठी सिझन 3 च्या घरात आता दोन गट तयार झालेत. यातच बिग बॉसने दिलेल्या हल्लाबोल टास्कमध्येही हेच गट नेमण्यात आले होते. आता या टास्कमध्ये कोणता गट बाजी मारणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातच स्पर्धकांना घरची कामं सांभाळून हे टास्क करायचे आहेत. विकास आणि विशालचा गटच घरात कामं करतोय तर दुसरा गट काहीच काम करत नसल्याचं त्यांना वाटतय.
या गटबाजीमुळे घर दोन भागात विभागलं गेलं असल्याचं जाणवतय. नुकतच जेवणाच्या टेबलावर विकासने बिग बॉसशी संवाद साधून त्याची भावना व्यक्त केली आहे. विकास आणि विशाल यांच्यात चर्चा सुरु असताना अचानक विकास पाटील म्हटला की “आता जरी रावणाचं राज्य असलं तरी एक ना एक दिवस राम राज्य येईल बिग बॉस काळजी करू नका”.
पुढे तो म्हणतो की, "सत्याच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि ही लढाई आम्ही जिंकणार असं देखील विकास म्हणाला. तर मीनलदेखील त्याला यात साथ देताना दिसली. मीनल म्हणते की “मला आंदोलन करायचं आहे. जी तानाशाही सुरु आहे त्याच्याविरोधात”.
दुसऱ्या गटाला एका खोलीत हसत-खेळत असताना बघून विकास म्हणतो की, "बघना सकाळपासून फक्त आपणचं काम करतो आहे आणि ते काय करत आहेत गेम खेळत आहेत. अख्खा महाराष्ट्र बघतो आहे बिग बॉस..."
तेव्हा बिग बॉस मराठी 3च्या घरात आज नवव्या दिवशी आणखी काय होतय हे बघणं महत्त्वाचं ठरेल.