By  
on  

बिग बॉस मराठी 3 : चावडीवर उत्कर्षला महेश मांजरेकरांनी सुनावले खडेबोल, म्हटले "सगळ्यात पार्शियल संचालक"

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये हल्लाबोल या टास्कनंतर एक वेगळं वातावरण पाहायला मिळतय. घरातील दोन गट आता स्पष्ट दिसू लागले आहेत. त्यातच आठवडाभर स्पर्धकांनी ज्या चूक केल्या त्या चावडीवर अधोरेखीत होणार आहेत. आजच्या चावडीवर महेश मांजरेकर स्पर्धकांची चांगलीच शाळा घेणार आहेत. 

 

हल्लाबोल टास्कमध्ये उत्कर्ष शिंदे हा संचालक होता. मात्र उत्कर्षने पक्षपात केला असल्याने महेश मांजरेकर यांनी त्याला खडेबोल सुनावले आहेत. हल्लाबोल टास्क दरम्यान जयच्या गटाने मिर्चीची धुरी वापरली होती. मात्र दुसऱ्या गटाला मिठाचं पाणी वापरण्यास उत्कर्षने मनाई केली.

यावर महेश मांजरेकर यांनी उत्कर्षची शाळा घेतली आहे. तो सगळ्यात पार्शियल संचालक असल्याच ते म्हटले आहेत. 

तर दुसरीकडे सुरेखा कुडची यांनी त्यांच्या गटासाठी चांगला खेळ खेळला नसल्याने त्या नेमक्या कुणाच्या बाजुने आहेत हे स्पष्ट दिसलं नाही. त्यामुळे महेश मांजरेकर यांनी सुऱेखा कुडची यांचीही शाळा घेतलीय. हल्लाबोल या टास्कदरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात अनेक राडे झाले. अनेकांनी शाब्दिक हल्लेही केलेत. तेव्हा महेश मांजरेकर कोणत्या स्पर्धकाच्या खेळाचं कौतुक करतील हे देखील महत्त्वाचं असेल. 

यावेळी महेश मांजरेकर आणखी कोणत्या स्पर्धकाची शाळा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ते आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive