आज बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. यातच आजच्या चावडीचे काही अपेट्स समोर आले आहेत. ज्यात महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची शाळा घेतलीय. या आठवड्यात झालेल्या हल्लाबोल टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये बरेच वाद झाले. यादरम्यान स्पर्धकांची वागणूक आणि चूका यावर आज महेश मांजरेकर चावडीवर स्पर्धकांची शाळा घेताना दिसतील.
यावेळी मीरा जगन्नाथचीही शाळा घेण्यात आलीय. बिग बॉसच्या घरात मीराकडे बिग बॉसपेक्षा जास्त पॉवर असल्याचं महेश मांजरेकर म्हणतात. महेश मांजरेकर म्हणतात की, "बिग बॉसचं सिझन आहे मीरा जगन्नाथ हाऊस नाही". शिवाय वुमन कार्डविषयी या आठवड्यात बरच बोललं गेलं. मात्र जेव्हा सोनाली आणि सुरेखा टास्कसाठी बसले होते तेव्हा वुमन कार्ड दिसलं नसल्याचं ते म्हटले. गायत्री, तृप्ती देसाईदेखील वुमन कार्डविषयी बोलताना दिसल्याचं महेश मांजरेकर म्हटले.
दर दुसऱ्या गटाने शेवटच्या फेरीत मानलेली हार पाहून नकारात्मक वाटलं असल्याचं महेश मांजरेकर म्हटलेत. शिवाय या टास्कदरम्यान विकास पाटीलने शिवी दिली होती. हा मुद्दा गायत्रीने चावडीवर बोलून दाखवला. महेश मांजरेकर यांनी घरात शिव्या नकोत म्हणून सांगत सगळ्यांना यावेळी ताकीद दिली. विकासनेही गायत्रीची त्यासाठी माफी मागीतली आहे.
सुरेखा कुडची दुसऱ्या गटात खेळत असल्याचं जाणवल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितली. यावेळी सुरेखा यांचीदेखील शाळा घेण्यात आली. हल्लाबोल टास्कमध्ये सुरेखा पहिल्या फेरीत बसण्यापेक्षा पुरुषांना बसायला द्यायला हवं होतं असही महेश मांजरेकर म्हटले.
आजच्या भागातील या महत्त्वाच्या गोष्टी चावडीवर बघायला मिळणार आहेत.