बिग बॉस मराठी 3 : स्नेहा वाघला पूर्वाश्रमीचा पती आविष्कारने मारली मिठी, मागितली माफी

By  
on  

बिग बॉसच्या घरात कधी काय होईल काहीच सांगता यत नाही. सध्या सुरु असलेल्या बिग बॉस मराठी 3 मध्येही असच होतय. नुकतीच विकएन्ड चावडी पार पडली आहे. यावेळी महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची पुन्हा एकदा शाळा घेतली. शिवाय विविध टास्कही घेण्यात आले. यावेळी आविष्कार दार्वेकर हा कमजोर सदस्य असल्याच महेश मांजरेकर यांनी सांगितलं.

महेश मांजरेकर यांच्या विधानाने आविष्कार दुखावल्याचं पाहायला मिळणार आहे. यावरून आविष्कार भावुक होऊन रडू लागला. इतर स्पर्धकांनी आविष्कारल समजावण्याचा प्रयत्न केला. सुरेखा कुडची, विशाल निकमही आविष्कारला समजावताना दिसले. त्यावेळी बाजूला स्नेहा वाघही उभी दिसली. यावेळी स्नेहाला पाहताच आविष्कारने स्नेहाकडे जाऊन तिला मिठी मारली आणि तिची माफी मागितली. यावेळी हे एक्स कपल एकत्र दिसल्याने अनेक चर्चा सुरु आहेत. अनेक वर्षांपूर्वी स्नेहा आणि आविष्कारचं लग्न झालं होतं. मात्र घरगुती हिंसाचारामुळे स्नेहा आणि आविष्कारचा घटस्फोट झाला होता. 

या विकएन्ड चावडीवर महेश मांजरेकर हे एक ट्विस्ट घेऊन आले. एक ब्रिफकेस बिग बॉसच्या घरात ठेवण्यात आली. ज्यात पाच लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं. नॉमिनेट असलेल्या सदस्यांपैकी कुणा एकाला ती ब्रिफकेस घेऊन बिग बॉसचं घर सोडण्याचा पर्याय देण्यात आला. यावेळी आविष्कारने ती ब्रिफकेस उचलली आणि तो घराबाहेर जाण्यासाठी निघाला.

मात्र ती ब्रिफकेस रिकामी असल्याचं नंतर महेश मांजरेकर यांनी सांगितलं. बिग बॉसच्या घरात चांगलं खेळणार असल्याचं आश्वासन आविष्कारने महेश मांजरेकर यांना दिलं होतं. असं असताना पाच लाखांची ब्रिफकेस दिसताच आविष्कारने ती घेऊन जाणं महेश मांजरेकर यांना पटलं नाही. त्यावर त्यांनी मजेत आविष्कारची शाळा घेतली. त्यानंतर आविष्कार भावुक झाला होता. 

Recommended

Loading...
Share