बिग बॉस मराठी 3 Day 12 : स्पर्धकांना मिळाला नवा टास्क, घरामध्ये रंगणार 'माझे मडके भरी' हे उपकार्य

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नवनवीन टास्क दिले जात आहेत. यात नुकताच आणखी एक नवा टास्क त्यांना देण्यात आलाय. बिग बॉसच्या घरात नुकतच काही आगळवेगळं घडलं. चक्क बिग बॉस यांनी त्यांचा फोन घरामध्ये ठेवला आणि म्हणूनच या आठवड्याची थीम असणार आहे 'टेलिफोन'.

जेव्हा जेव्हा या टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हनांना सामोरं जावं लागणार आहे असे बिग बॉस यांनी कालच्या भागामध्ये घोषित केले. काल घरामध्ये रंगले 'चार्ज करायचा नाय' हे नॉमिनेशन कार्य, ज्यामध्ये अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादुस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये  नॉमिनेट झाले.

आज घरामध्ये रंगणार आहे 'माझे मडके भरी' हे उपकार्य. आता हा टास्क नक्की माझे मडके भरी आहे की दुसर्‍यांचे मडके फोडी ? हे आजच्या भागामध्ये समोर येईल. आता या टास्कमध्येही स्पर्धकांमध्ये वाद होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 
घरातील भाड्यांची सुविधा जिंकण्यासाठी हे कार्य सोपवण्यात आलं असून टीम A आणि टीम B मध्ये ही बाजी कोण मारणार ? काय काय राडे होणार ? कोणत्या टीमची मडकी फोडली जाणार ? कोण कोणाशी पंगा घेणार ? हे पाहणं रंजक ठरेल.


 
 

Recommended

Loading...
Share