By  
on  

बिग बॉस मराठी 3 Day 12 : टास्कसाठी स्पर्धकांची चर्चा, विकास पाटील म्हणतो "उत्कर्षला शब्द पाळावाच लागेल"

 बिग बॉस मराठीच्या घरात आज नवा टास्क रंगणार आहे. 'माझे मडके भरी' या टास्कसाठी देखील सदस्य दोन गृप्स मध्ये विभागले जाणार आहेत. याच मुद्द्यावरून आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे. मीनल, विकास, सोनाली आणि आविष्कार मध्ये ही चर्चा होताना दिसेल. ज्यात कॅप्टन्सी टास्कसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये चर्चा पाहायला मिळेल. 

 
 
या संभाषणात मीनल सांगताना दिसेल की, “आता जो टास्क आहे त्यामध्ये देखील दोन गृप्स असणार आहेत.आणि यानंतर कॅप्टन्सी टास्क होणार ज्यामध्ये दोन उमेदवार निवडले जाणार. जर आपल्यातला कोणी त्यांच्या टीममध्ये गेला तर उत्कर्षसोबत डील करायची कारण तसंही त्याला डील करायला खूप आवडत. त्याला सांगायच की मी शंभर टक्के तुमच्या बाजूने खेळणार फक्त पुढच्या कॅप्टन्सी टास्कसाठी तुम्ही माझं नावं देखील द्या. म्हणजे एक त्यांच्या ग्रुपमधला आणि एक आपल्या ग्रुपमधला अशी बरोबर कॉम्पटिशन होणार.

यावर विकास म्हणतो की “उत्कर्षला जर डील दिली तर एक तर तो नाही म्हणेल पण जर तो हो म्हणाला तर त्याला शब्द पाळावाच लागेल कारण त्याला डबल ढोलकी म्हणून नावं आहे आता आधीच”.

आता या चर्चेनंतर विकासची टीम उत्कर्षला त्यांच्या बाजूने वळवण्यात यशस्वी होते का ? कसा रंगले हा टास्क आणि कोण होईल कॅप्टन हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive