By  
on  

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांनी साजरा केला नवरात्रोत्सव

सगळीकडे सध्या नवरात्रोत्सवाचं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे बिग बॉस मराठी 3 च्या घरात स्पर्धक उत्सवाच्या वातावरणात परिवारापासून दूर आहेत. मात्र असं असलं तरी बिग बॉस मराठीच्या घरातही उत्सवाच्या वातावरणाचा हे स्पर्धक आनंद लुटत आहेत.

नवरात्रीच्या निमित्ताने स्पर्धकांनी छान पारंपारिक वेशभुषा करुन बिग बॉस मराठीच्या घरात नवरात्री साजरी केलीय. तर काही स्पर्धकांनी गरबा डान्सही केलाय.

हे स्पर्धक कुटुंबापासून दूर असले तरी बिग बॉसच्या घरात त्यांचं एक वेगळं कुटुंब तयार झालय. त्यामुळे या कुटुंबासोबत हे स्पर्धक नवरात्रोत्सव साजरा करत आहेत.

नुकतीच बिग बॉस मराठी 3 च्या घरातील काही क्षणचित्रे समोर आली आहेत. ज्यात स्पर्धक नवरात्रोत्सवाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive