बिग बॉस मराठी 3 : टास्कदरम्यान आदिश वैद्य आणि स्नेहा वाघमध्ये जुंपली

By  
on  

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये सध्या विविध वळण पाहायला मिळत आहेत. नुकतीच या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिश वैद्यची एन्ट्री झालीय. आदिशच्या येण्याने घरात खळबळ माजलीये. सगळीकडे त्याच्याविषयी चर्चा सुरु आहेत. त्यातच बिग बॉसने आदिशला दिलेल्या कार्यामुळे जय आणि त्यांचा गट आदिशचा राग करुन लागलाय. एवढच नाही तर आदिश आणि जयमध्येही खटके उडायला सुरुवात झालीय.

 

यातच बिग बॉसने एक नवं कार्य स्पर्धकांना दिलय. या कार्यादरम्यान आदिश आणि स्नेहा वाघमध्ये वाद होऊ लागलेत. टास्कसाठी चर्चा करण्यासाठी आदिश स्नेहाकडे गेला मात्र स्नेहाच्या नकारात्मक प्रतिक्रियेचा सामना त्याला करावा लागला. ज्याने या चर्चेचं रुपांतर वादात झालं. 

आदिश म्हणत होता की, "माझं इन्फ्लुएन्स काउंट होणारेय.." यावर स्नेहा म्हणते की, "तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काउंड होणार नाही. तुम्हाला असं वाटतय की मी तुमच्याकडे येईल प्रतिक्रिया मागायला तर तसं होणार नाही. मी काय विचारू." 

यानंतर आदिश विचारतो की, "काय ?" ज्यावर स्नेहाची संतापजनक प्रतिक्रिया त्याला मिळालीय. हा वाद आणि नवा टास्क आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

आदिशची एन्ट्री झाल्यापासून त्याच्यासोबत अनेक जण हुज्जत घालताना दिसत आहेत. मात्र तो प्रत्येकाला सडेतोड उत्तर देताना दिसतोय. तेव्हा आदिशचा बिग बॉसच्या घरातील पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share