बिग बॉस मराठी 3 : स्नेहाला वाचविण्यासाठी जय डावपेच आखणार ? बिग बॉस देणार नवा टास्क

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या घरात स्पर्धकांना विविध टास्क मिळत आहेत. एकामागोमाग एक कॅप्टन्सी कार्यात एकमत न झाल्याने आता वाईल्ड कार्ड स्पर्धक आदिश वैद्यला कॅप्टन बनविण्यात आलय. मात्र आता बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नुकताच या नव्या कार्याचा प्रोमो समोर आलाय.

या नॉमिनेशन कार्यात एकमेकांना नॉमिनेट करण्यासाठी स्पर्धकांनी कंंबर कसली आहे. या कार्यात घरातील दोन्ही गट स्वत:ला नॉमिनेशन पासून वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

प्रोमोमध्ये सदस्यांची जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ सुरू आहे. आणि जीपमध्ये गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीरा हे सदस्य बसलेले दिसत आहेत. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे.  यात स्नेहाचं नाव आलय.

 

मात्र स्नेहाला नॉमिनेशनमधून वाचविण्यासाठी जय कोणता डावपेच आखणार ? जयची साथ स्नेहाला मिळेल का ? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.


 
एकीकडे जय दुधाणे आणि स्नेहा या दोघांमध्ये मैत्री झालीय. दोघांची जवळीकही वाढताना दिसत आहेत. मात्र टास्कदरम्यान जय ग्रुपसाठी खेळेल की स्नेहासाठी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Recommended

Loading...
Share