बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच नवा टास्क देण्यात आलाय. बिग बॉस स्पर्धकांना कॉलेजच्या आठवणीत घेऊन घेलेत. या बीबी कॉलेजमध्ये विद्यार्थीच नव्हे तर प्राध्यापक धाक दाखविण्या बरोबरच विद्यार्थ्यांनसोबत मैत्री करून मज्जा करत त्यांना शिकवताना दिसत आहेत.
बिग बॉस यांनी सदस्यांवर 'करूया आता कल्ला' हे साप्ताहिक कार्य सोपवले आहे. या कार्यात कॅप्टन्सीचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. लक्षवेदी विद्यार्थी ठरण्यासाठी सदस्य प्रयत्न करणार आणि जे विद्यार्थी अधिक स्टार मिळवतील ते कॅप्टन पदाचे दोन उमेदवार म्हणून कार्याच्या शेवटी निवडले जातील.
नुकतच उत्कर्ष, आदिश, दादूस या प्राध्यापकांचे तास भरले. तर आजच्या भागात सुरेखा कुडची, सोनाली, मीरा यांचे तास भरणार आहेत. स्टार मिळविण्यासाठी सगळ्यांचीच धडपड सुरू आहे. बरेच प्लॅन देखील आखले जात आहेत. यात आत्तापर्यंत स्नेहाला दोन तर विशाल निकमला एक स्टार मिळालाय.
काल दादूस यांच्या क्लासमध्ये संगीताची मैफल रंगली, तर आदिशने गायत्रीला हसवले, उत्कर्षने घरातील equation बद्दल बरंच काही सांगितलं. आज सोनाली पाटील बीबी कॉलेजमध्ये प्रेमाचे धडे देणार आहे.. सोनालीच्या तासात प्रेमाचे वारे वाहणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात जय - स्नेहा, सोनाली - विशाल यांना ससदस्यांकडून खूप चिडवले जाते. असच चित्र आज पाहायला मिळेल.
सोनाली विद्यार्थ्यांना पहिल्या प्रेमाविषयी विचारणार आहे. या दरम्यान विशाल -सोनालीचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. आजच्य भागात बीबी कॉलेजमध्ये स्पर्धक काय धमाल करतील आणि कल्ला करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.