बिग बॉस मराठी 3 : उत्कर्षची विकाससोबत चर्चा, म्हटला “त्याची सत्ता आणण्यासाठी तो विशालचा वापर करतो"

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात आता टास्क जिंकण्यासाठी स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी स्पर्धक विविध शक्कल लढवताना दिसत आहेत. यातच आता टास्कसाठी विविध चर्चा होऊ लागल्या आहेत. यात आजच्या भागात उत्कर्ष, जय, गायत्री, मीरा विकास यांच्यात चर्चा होताना दिसेल.

या चर्चेत विकास उत्कर्षकडे मत मागयला जाणार आहे. त्यावर उत्कर्ष म्हणतो की, “मला काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्ही सगळे उभे राहू तुझ्या बाजूने, पण इकडची जबाबदारी कोण घेणार ? मी कसं म्हणतो आहे आम्ही सगळे तुझ्या बाजूने उभे रहातील. तू दिसलास ना त्याची कमी होऊन जाईल. तो जो हवेमध्ये गेला आहे ना... आम्हांल तू आलास तर चालेल. आम्हांला वाटतं आहे तू यावं. पण इथे मग रिकाम ठेवा ना. तू बाकीच सांभाळशील मग मीरा करेल. विशालचा फक्त चेहरा आहे आणि मागे तो आहे. तो त्याची सत्ता आणण्यासाठी विशालचा वापर करतो आहे. विशाल भोळा आहे, तो विशालचा वापर करतो आहे. विशाल वाटतं आहे मी कॅप्टन होतो आहे ना बसं मग. त्याला हे कळत नाहीये तो त्याचा वापर करून त्याला फेकून देणार, मग काय फायदा ? आज विशाल आहे उद्या तो कोणाचा पण वापर करेल फायदा काय... ते पण आल्या आल्या.”

विकाससोबत बोलताना उत्कर्ष नेमका कुणाचा उल्लेख करतोय हे बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागात समोर येईलच


 
 

Recommended

Loading...
Share