बिग बॉस मराठी 3 : कॅप्टन्सी टास्क दरम्यान बिग बॉस मराठीचं घर बनलं कुस्तीचा आखाडा

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'करूया आता कल्ला' हे साप्ताहिक कार्य बीबी कॉलेज या थीम अंतर्गत सुरू होते. ज्यामध्ये घरामधील काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य प्राध्यापक बनले होते. मात्र या कार्यानंतर स्पर्धकांना कॅप्टन्सी टास्क देण्यात आला. मात्र हा टास्क करताना सदस्य भान हरपून गेले.


या कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी सुरेखा कुडची, स्नेहा वाघ आणि विशाल निकम हे तीन सदस्य असणार आहेत. मात्र या टास्क दरम्यान अनेक वाद होताना पाहायला मिळतील. फक्त वादच नाही तर स्पर्धकांची एकमेकांसोबत हातापायी होताना दिसेल.

हा टास्क करत असताना स्पर्धक आपले भान हरपून हातापायी करताना दिसतील. स्पर्धक कोणत्या सदस्याला कॅप्टन बनवतील आणि या टास्कमध्ये कोण उत्तम स्ट्रॅटेजी करतय हे आजच्या भागात पाहायला मिळेल.

हे कॅप्टन्सी कार्य तरी स्पर्धक सुरळीत पार पाडतील. बिग बॉस मराठी 3 मध्ये आता नवा कॅप्टन कोण असेल ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅप्टन्सीसाठीचा नवा टास्क आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
 
 

Recommended

Loading...
Share