बिग बॉस मराठी 3 : इतर सदस्यांना आदिश सांगणार सुरेखा यांच्याविषयीच्या या गोष्टी

By  
on  

 बिग बॉस मराठीमध्ये सुरू असलेल्या 'करूया आता कल्ला' या टास्कमध्ये नुकतच सुरेखा कुडची यांनी आदिशला सुनावले की "तू आता आला आहेस बीबी मध्ये आम्ही जुने आहोत." त्यावरून आदिशला सुरेखा कुडची यांचा प्रचंड राग आला. आणि त्यावरूनच तो आज विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर त्याचं मत मत मांडताना दिसणार आहे. आता यावरून घरामध्ये अजून कोणता राडा होणार हे आजच्या भागामध्ये समोर येईल.
 
आदिश हा सुरेखा यांच्यावर रागावून त्याच्या मनातल्या गोष्टी तो विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर सांगणार आहे. आदिश म्हणतो की, “आता टास्कमध्ये जास्त मला बोलायचं नाहीये, आता टास्क पहिले होऊन जाऊदे. स्वत:ला जायचं होतं कालपर्यंत बाहेर.. रडारड केली चार दिवस. माझं काय, मला खेळायचं नाही म्हणून. थँक यू नोट देताय का आतापासून... जाना मग. मी तुम्हांला स्पष्ट सांगतो वाईट नका मानून घेऊ, तुमची लायकी काढली आहे सगळ्यांची. तुमची इनडायरेक्टली लायकी काढली."

आदिशच्या या म्हणण्यावर सोनाली म्हणते की “ती काय लायकी काढणार आमची. टॉप 5 मध्ये कोण आहे हे आता ही ठरवणार ? आणि कालपर्यंत रडत होती. माझं काही चालणार नाही, हे होणार नाही ते होणार नाही. हा रूल तुम्ही सगळ्यांना दिला का टॉप 5 कोण आहे हे सांगता?”

तेव्हा आदिश आणि सुरेखा यांच्यात वादाची ठिणगी पेटणार का ? पुढे काय होईल हे आगामी भागात पाहायला मिळेल.

Recommended

Loading...
Share