बिग बॉस मराठी 3 : चावडीवर आदिशसह मीरा, गायत्री, उत्कर्षची शाळा

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या घरात या आठवड्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. ज्यामुळे चावडीवर या सगळ्या गोष्टींवर चर्चा होईल तर महेश मांजरेकर शाळाही घेतील. या आठवड्यात आदिश वैद्य हा वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आला. त्यानंतर त्याने काय काय चूका केल्या हे महेश मांजरेकर त्याला सांगणारेत. शिवाय त्याची शाळाही होणारेय.

स्नेहासोबत आदिश उगाचच वाद घालत असल्याचं महेश मांजरेकर चावडीवर म्हटलेत. महेश मांजरेकर म्हटले की, "किती छळत होतास त्या स्नेहाला. तुला काय करायचं होतं तिकडे."

तर दुसरीकडे दादूस यांनाही महेश मांजरेकरांनी महत्त्वाचा सल्ला दिलाय. ते म्हटले की "दादूसला कोणीही मॅन्यूपिलेट करतं. एकदा सांग तू मला डोकं आहे. मी माझ्या डोक्याने खेळेल. तुम्हाला कळत नाही का तुम्हाला वापरून घेतलं जातय ते."

तर दादूसला गाडीत बसण्याच्या टास्कमध्ये जाऊ न दिल्याने उत्कर्ष का गाडीतून उतरला नाही यावर त्याची शाळाही घेतली गेली. 

याशिवाय मीरा जगन्नाथ आणि गायत्री दातार यांच्या काम न करण्याच्या निर्णयावरही त्यांची शाळा घेतली गेली.

Recommended

Loading...
Share