बिग बॉस मराठी 3 : स्नेहा वाघ जयला म्हणते की, "माझा बाकीच्यांवर अजिबात विश्वास नाही"

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात सध्या काही आठवड्यानंतर वेगळं वातावरण पाहायला मिळतय. कुणावर विश्वास ठेवावा ? कोणं खरं बोलतय आणि कोण खोटं ? याचाही अनेक स्पर्धकांचा गोंधळ होतोय. यात स्नेहा वाघचाही असाच गोंधळ झालाय. स्नेहा बर्‍याचदा जयला सांगताना दिसते की, तिचा फक्त जयवरच विश्वास आहे बाकी कोणावर नाही. मग उत्कर्ष असो, वा बाकीचे त्यांच्या गटातील स्पर्धक असो. याचबद्दल जय आणि स्नेहा बोलताना दिसणार आहेत. 


 
आगामी भागात स्नेहा जयसोबत चर्चा करताना दिसणार आहे. स्नेहा म्हणते की, “तुमच्या चौघांमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तू त्यांच्याशी लॉयल रहा. तुम्ही तुमचे रहा. तुम्ही ते करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी तुला हे सांगते जसं मी आधी देखील सांगितले मला तुझ्यावर विश्वास आहे, पण मी बाकीच्यांवर विश्वास नाही ठेऊ शकत.”

यावर जय स्नेहाला म्हणतो की, “काल जी गोष्ट झाली ना... लॉयल्टी ची गोष्ट वेगळी आहे. मी आता उत्कर्षला देखील सांगितलं. नको ठेऊस विश्वास बाकीच्यांवर.”

बिग बॉस मराठीच्या घरात स्नेहा आणि जयची चांगली मैत्री झालेली पाहायला मिळतेय. मात्र जयच्या ग्रुपमधील सदस्यांवर स्नेहाचा विश्वास नसल्याने तिने या गोष्टीची जयसोबत चर्चा केलीय.

Recommended

Loading...
Share