बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नुकतच एक नवीन कार्य देण्यात आलय. 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' असं या टास्कचं नाव असून हे कॅप्टन्सी कार्य आहे. आदिश आणि मीरामध्ये नुकताच उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि कॅप्टन पदाची पहिली उमेदवार ठरली.
आता टीम ए म्हातारी बनणार असून टीम बी म्हणजेच विशाल, सोनाली..... प्राणी बनणार आहेत. ज्यात या टीमला भोपळे लपवायचे आहेत. आणि विकास हा टीम ए मध्ये असल्याने तो टीम बी सोबत कार्याची रणनीति आखताना दिसणार आहे.
विकास म्हणतो की , “दुसर्या राऊंडला आजीचे गाठोडे आहे ना ते उघडायचे आणि त्याच्यामध्ये भोपळा ठेवायचा, भोपळा ठेवला की, परत गाठोड आहे तिथे ठेवायचे. मी येणार डायरेक्ट गाठोड घेऊनच आत येणार. तिघांना बाहेर काढायचे आहे. विशाल तुझं पहिलं काम जिथे जयचा टाकशील तिथे उत्कर्षचा टाकशील आणि तिथेच दादूसचा पण टाकशील. आपल्याला हे तीन लोकं बाहेर काढायची आहेत. हे तीन एकदा बाहेर गेले की मग ... पुढे मग खेळवा तुम्ही सगळ्यांना. कारण तेव्हा फक्त मुली राहतील. काल जे ते करत होते ना, आपल्याला तितकं नाही करायचे"
तेव्हा विकास मास्टरमाईंड बनून आणखी काय योजना आखतोय आणि हा टास्क नेमकं कोण जिंकेल ? कॅप्टन कोण बनेल ? हे बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागातून समोर येईलच.