बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार राडा, विशालने तोडलं कारागृह ?

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता आजीचं आगमन झालय. ह्या आजी आता विविध टास्क देताना दिसत आहेत. नुकतच 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हे नवं टास्क देण्यात आलय. या टास्कअंतर्गत घरात राडा होताना दिसणार आहे.

भोपळा शोधायच्या या टास्क दरम्यान काही स्पर्धक कारागृहात अडकणार आहेत. जय आणि उत्कर्ष स्वत: बाहेर येऊन इतर स्पर्धकांना कारागृहात अडकवताना दिसत आहेत. याचा प्रोमोही नुकताच समोर आलाय. मात्र यात असं काही दिसलं जे थक्क करणारं होतं. या टास्कदरम्यान विशाल निकमनं कारागृहाच्या दरवाज्याला लाथ मारून ते तोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. ते तुटताच विकास पाटील कारागृहात बाहेर पडताना दिसतोय.

सध्या स्पर्धकांमध्ये टास्कसाठी दोन गट पाडुन दिले असले तरी कोण कुणाच्या बाजुने खेळतय हे देखील आगामी भागात पाहायला मिळेल.

या टास्कदरम्यान हा राड कसा झाला ? या टास्कमध्ये पुढे काय होणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

Recommended

Loading...
Share