बिग बॉस मराठी 3 : मीनलने दिलेल्या डीलवर मीराची विशाल आणि गायत्रीसोबत चर्चा

By  
on  

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा खेळ चांगलाच रंगात आलाय. यातच कॅप्टन्सी मिळवण्यासाठी स्पर्धकांनी प्रत्येक टास्कसाठी कंबर कसलीय. कॅप्टन्सीमुळे इम्युनिटी मिळते आणि म्हणूनच कॅप्टन्सी कार्यात स्पर्धकांचा जोश काही वेगळाच असतो. हीच सदस्य कॅप्टन्सी मिळविण्यासाठी टास्कच्या आधी असो वा आठवड्याच्या सुरुवातीला असो डील करायला तयार होत आहेत. अशीच डील नुकतीच मीनलने केली आहे. 

मीनलने टास्क सुरु होण्यापूर्वी मीराला डीलसाठी विचारलय. मात्र मीराने या डीलविषयी विशाल आणि गायत्रीसोबत चर्चा केलीय. जिथे मीरा या डीलविषयी विशालला सांगताना दिसणार आहे.

मीरा विशालला म्हणते की, "मला कॅप्टन नाही बनू द्यायचे, त्यांचं असं आहे की त्यालाच बनायचे आहे. मी मीनलला सांगणार होते पण मग मी म्हंटल त्यांच्या टीममध्ये आहे तिला कळेल. नाही तर जाऊ दे... माझं काम नाही तिला जाऊन सांगण. तोंडावर क्लियर ते बोलले आहेत. जयलाचं कॅप्टन बनवणार. माझं असं झालं टीम जिंका तरी आधी. मीनल गेम चालू व्हायच्या आधीच माझ्याकडे आली होती माहिती आहे का...डील घेऊन. मी तिला म्हंटल गेम सुरू तर होऊ दे. मला कॅप्टन बनायचे आहे, मी म्हंटल मला पण व्हायच आहे कॅप्टन. तिचं असं होत मी हारायच आणि तिला कॅप्टन बनू द्यायचं.

यावर विशाल म्हटला की, “हे मी पण नाही करणार. जरी आम्ही एका टीममध्ये असतो तरी नसतं केलं मी.”


या चर्चेनंतर खेळ पुढे कसा रंगतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share