बिग बॉस मराठी 3 : कॅप्टन्सी टास्कमध्ये स्नेहा वाघ कुणाला देणार मत ? विशालची स्नेहासोबत चर्चा

By  
on  

बिग बॉस मराठी 3 मध्ये नुकतच काही भावुक क्षण पाहायला मिळाले. यावेळी स्पर्धकांना घरचा नवा कॅप्टन निवडण्यासाठी कार्य देण्यात आले होते. यावेळी स्पर्धकांना त्यांच्या आवडत्या वस्तूंचाही त्याग करावा लागला. यावेळी जय दुधाणे आणि विशाल निकम यांच्यापैकी एकाला कॅप्टन बनवण्यासाठी दिलेल्या तराजूनमध्ये वजनं ठेवून एकाचं पारडं जड करायचं होतं. यावेळी मीरा, गायत्री, उत्कर्ष यांनी जयसाठी दिलेल्या अटी मान्य केल्या तर आवडत्या वस्तूंचा त्याग केला. दादूस यांनी तर चक्क त्यांच्या केसांचा त्याग करत टक्कल केलं. 

तर दुसरीकडे मीनल, विकास, सोनाली आणि नीथा यांनी विशालला समर्थ दिलं. विकासने तर चक्क विशालसाठी केस मुंडवून टक्कल केलं. हे पाहुन मित्रासाठी स्वत: विशालने देखील टक्कल केलं. यानंतर अखेर आता स्नेहा वाघकडे शेवटचा निर्णय आहे. विशाल आणि जय या दोघांचं पारडं सध्या समान आहे. तेव्हा स्नेहाला दोघांपैकी कुणा एकाला मत देऊन कॅप्टन बनवायचे आहे.

यात आगामी भागात विशाल हा स्नेहासोबत चर्चा करताना दिसणार आहे. विशाल स्नेहाला म्हणतो की, "स्नेहा मी मानतो तर इथून मानतो, आधीसुध्दा मी होतो तुमच्याबरोबर आणि इथून पुढे देखील कायम राहीन. माझं प्रेम असंच आहे."

स्नेहा आणि जयची मैत्री तर आता जगजाहीर असताना स्नेहा कॅप्टन्सीसाठी कुणाला वोट करते हे आजच्या भागात पाहणं महत्त्वाचं ठरेल. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून स्नेहाच्या वोटनंतर काहीतरी ट्विस्ट येणार असं चित्र दिसतय.
 

Recommended

Loading...
Share