By  
on  

बिग बॉस मराठी 3 : सोनाली पाटीलला अश्रु अनावर, विकाससोबत बोलताना झाली भावुक

बिग बॉस मराठीच्या घरात दररोज काहीना काही घडत असतं. कधी टास्क तर कधी चर्चा, कधी हसत खेळत सगळे एकत्र येतात तर काही भावुक क्षणही पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कनंतर घरात असच काहीसं वातावरण पाहायला मिळतय.

नुकतच सोनाली आणि विकास पाटील एकत्र बोलताना दिसणार आहेत. मात्र या चर्चेत सोनाली भावुक झालेली दिसली. तिला अश्रु अनावर झाले आणि ती रडू लागली. सोनालीच्या या रडण्याचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही.


 
यादरम्यान विकास हा सोनालीला समजावताना दिसणार आहे. विकासचं म्हणण आहे की, “ठीक आहे मीनलच्या बाबतीत काही गोष्टी आहेत. पण आता तुमच्या दोघींमध्ये काय नक्की, कुठल्या पॉइंटवरुन सुरू झालं आहे ? काय झालं आहे ? ते कळतचं नाहीये. लोकांना जर हे दिसत आहे की तू जेन्यूयन आहेस आणि तुला समोरून तितकसं मिळत नाहीये. तर उलट मग तुझा फायदा होतो आहे ना ? सिम्पथी तुझ्याकडे येते आहे."

यावर सोनाली कॅप्टन्सी कार्याच्या दरम्यान विशालसाठी गळ्यात घातलेली पाटी दाखवून म्हणते की, "आणि हे वाक्य, किती मोठं वाक्य आहे हे"  त्यावर विकास म्हणतो की, "पण सोनाली हा चॉइस तुझ्याकडे होता ना, ते गळ्यात घालायचे की नाही... हा चॉइस तुझा आहे ना ? नाही म्हणू शकली असतीस."

कॅप्टन्सी टास्कमध्ये विशालला मत देण्यासाठी सोनालीने बिग बॉसच्या अटी मान्य करत ही पाटी गळ्यात घातली होती. ज्यावर 'मी या घरात राहण्यास पात्र नाही' असं लिहीलं आहे.
आता नेमकं सोनालीला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटतय ? ती का रडली ? हे बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागातून समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive