बिग बॉस मराठी 3 : दादूस यांना येत आहे या सदस्याची आठवण

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात आता स्पर्धकांचे एकमेकांसोबत चांगलं नातं तयार झालय. काहींची चांगली मैत्री झाली तर काहींची नाती जुळली. एका ग्रुपमध्ये असो वा वैयक्तिक गेम खेळत असो या घरामध्ये सदस्यांच्या मैत्री होतात आणि त्या बर्‍याचदा घराबाहेर देखील तश्याच राहतात.

सुरुवातीच्या काळात घरात सी ग्रुप बनला होता. ज्यात तृप्ती देसाई, स्नेहा वाघ, सुरेखा कुडची आणि दादूस त्या ग्रुपमध्ये होते. या चौघांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. त्यांच्या कितीही मतभेद झाले, एकमेकांचा राग आला तरीदेखील ही मैत्री तशीच राहिली. आणि याच मैत्रीची आठवण दादूस यांना नुकतीच झालीय.

दादूस यांना अचानक तृप्ती देसाई यांची आठण झाल्याचं पाहायला मिळालय. ते म्हणतात की, "तृप्ती मॅडमना मिस करतो आहे. आठवण आली मला." ज्यावर सोनाली म्हणते की, "आम्ही आत्ताच नावं काढलं त्याचं". तर स्नेहा वाघ म्हणते की, "बघत असतील त्या बाहेरून."

दादूस म्हणतात की, "तृप्ती मॅडम मिस यू. सगळेजण आम्ही तुम्हांला मिस करतो आहे. नक्की बघा आम्हांला खूप खूप प्रेम द्या तिकडून." तर स्नेहा देखील तृप्ती देसाई यांना मेसेज देताना दिसतेय. ती म्हटली की, "तृप्ती मॅडम मिस यू. खूप खूप प्रेम द्या... "

 

Recommended

Loading...
Share