बिग बॉस मराठी 3 : टास्कदरम्यान जय आणि विकासमध्ये झाला वाद

By  
on  

 ही पाइपलाईन तुटायची नाय’ या साप्ताहिक कार्यामध्ये कॅप्टन्सीसाठी कुठले दोन उमेदवार मिळणार याची चर्चा आणि प्लॅनिंग बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरु आहे. आगामी भागात मीनल आणि विकास याविषयी चर्चा करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे जय आणि विकासमध्ये मोठा वाद होताना दिसणार आहे. दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटलेली पाहायला मिळेल.


 
मीनल विकासला सांगताना दिसेल की, "मला असं वाटतं की विशाल आणि जय परत आले तर नाही बनू देणार जयला यावेळी परत." तर दुसरीकडे टास्कदरम्यान जय आणि विकासनमध्ये मोठं भांडण होताना दिसणार आहे. जय विकासला म्हणतो की, "तू शब्द सांभाळून वापर."

विकास त्यावर जयला उत्तर देताना दिसेल. "येडामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तू काय काय बोलतो ते सांगू." जयने यावर विकासला प्रतिक्रिया दिली की, "तू एकटा शहाणा आहेस का रे ?" त्यावर विकास म्हणाला, "हो मी एकटा शहाणा आहे, दीड शहाणा नाही दोन शहाणा आहे." यावर विकासला जयने सल्युट केला. मग विकास म्हणाला, "बाप बाप होता है".

यात इतर स्पर्धकांना दोघांना सावरताना दिसतील. आगामी भागात टास्कमध्ये जय आणि विकासमध्ये वादाची ठिणगी कशी पेटते ? कॅप्टन्सीचा उमेदवार कोण बनतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 
 

Recommended

Loading...
Share