बिग बॉस मराठी 3 : विशालची उत्कर्ष आणि जयसोबत चर्चा, विकासला विशालवर शंका ?

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात कोण कधी खेल पलटेल सांगू शकत नाही. तर कधी कोण कोणाच्या विरोधात जाईल हे देखील सांगता येत नाही. दररोज या घरात चित्र बदलताना दिसत आहे. सदस्यांचा खेळ आणि नाती याचा गुंता सध्या पाहायला मिळतोय. कारण बिग बॉसच्या घरात काही स्पर्धकांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झाल्यान गट पडले आहेत. यातच विविध टास्क दरम्यान स्पर्धक कंबर कसून खेळताना दिसत आहेत.


स्पर्धकांना आता बिग बॉसनी नवा टास्क दिलाय. या टास्कमध्ये जय आणि विकास मासे विकताना दिसत आहेत. इतर स्पर्धक त्यांचे मासे खरेदी करत आहेत. या सगळ्यात विशाल आता दुसऱ्या गटासोबत चर्चा करताना दिसणार आहे. विशालची उत्कर्ष आणि जयसोबत चर्चा होताना दिसणार आहे. उत्कर्ष विशालला म्हटला की, "तू एकतर माझ्याकडे येणार किंवा जयकडे जाणार. जय तुझ्याकडे येणार किंवा मी तुझ्याकडे येणार, तीनच गोष्टी आहेत. विकास या गोष्टीत डायरेक्ट येत नाही. सपोर्टिव तुला आणतो आणि मग स्वत: मागून येतो पण होतंय काय इथेचं फिरत चाललय सगळं."

तर दुसरीकडे विकासची मीनलसोबत चर्चा सुरु आहे. जिथे दोघ विशालविषयी बोलताना दिसतील. "तरी मला आता जे दिसते आहे, तो गेल्या काही दिवसांपासून त्या गोष्टी करतो आहे. तिकडे जाऊन बोलतो आहे. त्याला असं कुठेतरी वाटतं आहे की हे आपण केले पाहिजे." पुढे विकास म्हणतो की, "हा त्याचा गेम नाहीये, हा माझा गेम आहे. म्हणजे बोलणं म्हणा किंवा काही ते पण आता मी कमी केले आहे. त्यातून काही चांगलं निष्पन्न होत असेल तर काही चुकीचे नाहीये."

विकास इतर गटाशी जाऊन जसा चर्चा करतो ते करण्याचा प्रयत्न विशाल करत असल्याचं त्याला वाटतय. आता या सगळ्यात टास्कमध्ये काय निष्पन्न होतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बिग बॉसने दिलेला टास्क कोण जिंकतय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  
 
 

Recommended

Loading...
Share