बिग बॉस मराठी 3 च्या घरात जशी मैत्री पाहायला मिळते, तसच या मैत्रीत वाद होतानाही दिसतात. विशेषकरून विशाल पाटील आणि सोनाली पाटील या दोघांमध्ये वाद मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद होताना पाहायला मिळणार आहे.
विशाल, विकास आणि सोनाली यांच्यामध्ये गप्पा सुरु असताना पुन्हा एकदा विशाल आणि सोनालीमध्ये खटके उडताना दिसतील.तिघांच्या गप्पा सुरू असताना सोनाली विकासला सांगत होती की, "खूपदा असं वाटलं की इतक्या जोरजोराने ओरडवं, खूपदा असं वाटलं रडावं तरीसुध्दा खूप छान स्माईल करून त्या गोष्टीला फेस केलं मी."
विशाल त्यावर हसत म्हणतो की, "एवढं सिरियस सांगते, बावळट आहे का ? मी तेच ऐकतो आहे बघतो आहे." यावर सोनाली विकासला म्हणते की, "नको इनवॉल्व करूस त्याला आपल्यामध्ये." यावरुन पुन्हा एकदा विशाल आणि सोनालीमध्ये वाद निर्माण झालाय. जिथे विशाल सोनालीला म्हणतो की, "तिकडे जाऊन बसा मग. तू आली आहेस इथे, आमच्यामध्ये." या सगळ्यात विशाल सोनालीला बोलण्याच्या पद्धतिविषयी सांगणार आहे. तो म्हणतो की, "असं नाही बोलू शकतं. ठीक आहे असू दे. चुकीच बोलीस तू पण मी तुला माफ केलं."
यापुढे दोघांमध्ये हा वाद वाढतो का ? की पुन्हा टास्कसाठी दोघं एकत्र येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.