Breaking : बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर येणार सुपरस्टार सलमान खान

By  
on  

बिग बॉस मराठीचं सध्या तिसरं पर्व सुरु आहे. यंदाच्या पर्वालाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. सोशल मिडीयावरही तिसऱ्या सिझनची चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर दुसरीकडे बिग बॉस हिंदीच 15 वं पर्वही सुरु आहे. याच हिंदी बिग बॉसच्या मंचावर काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी हजेरी लावली होती. तो भाग प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. विकएन्ड का वारच्या भागात अंतिम सिनेमाच्या प्रमोशनसाठी महेश मांजरेकर आणि सलमान खान दोघांनी मिळून विकएन्ड वार जोरदार रंगवला होता.

यातच आता सलमान खान बिग बॉस मराठी 3 च्या मंचावर येत असल्याची चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये सलमान खानने हजेरी लावली होती. त्याने स्पर्धकांशीही संवाद साधला होता. सलमान हा चांगला मराठी बोलतो आणि त्याला कळतही, त्यामुळे त्याने मराठीतही संवाद साधला होता. 

मात्र आता बिग बॉस मराठीच्या चावडीवर सलमान खानची हजेरी पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. तेव्हा सुपरस्टार सलमान खानच्या येण्याने चावडीची रंगत आणखी वाढेल यात शंका नाही. शिवाय बिग बॉस मराठीचे स्पर्धकही सलमानला पाहुन आनंदी होतील. 

'अंतिम' या सलमान खानच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलय. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार असल्याचं बोललं जातय. तेव्हा आगामी चावडीकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलय.

Recommended

Loading...
Share