बिग बॉस मराठी 3 : सोनाली आणि विकासमध्ये वाद, सोनाली म्हणते "मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्या नाहीत "

By  
on  

बिग बॉस मराठी 3 च्या आगामी भागात पुन्हा एकदा वाद पाहायला मिळणार आहे. हा वाद असेल बी टीममधील सोनाली आणि विकास यांच्यामधील. बिग बॉस मराठीच्या घरात दोन गट पडलेत. यात विकास, विशाल, सोनाली, मीनल यांच्या गटात कायम वाद होताना दिसत आहे. 

आता ही वादाची ठिणगी कोणामुळे पडली ? नक्की काय घडलं ? हे आपल्याला आगामी भागामध्ये कळेलच. पण मीनल सोनालीला समजवण्याच्या प्रयत्नात दिसणार आहे. तर दुसरीकडे सोनाली मात्र विकास आणि मीनलचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. 


 
मीनल सोनालीला सांगते की, "स्वत:ला त्रास करून नको घेऊस. तुझे मुद्दे त्याला बोल. पण आरामात बोल, तो पण आरामात ऐकतो आहे." सोनाली मीनलला विकासबद्दल उद्देशून सांगताना दिसणार आहे. ती म्हणते की "नाही गं हे बोलायला लागले की माझ्या डोक्याचा टेंपरचं गरम होतो. त्याला तसली सवय आहे. त्याला ना हजार लोकांना टॅकल करायची सवय आहे. हजार लोकांना गोल गोल फिरवायची सवय आहे. हे बघ आपल्याला तसंल काही येत नाही. साधी गोष्ट आहे, हे खटकलं."

यावर विकास म्हणतो की, "शिकून घे माझ्याकडून हे, चांगली गोष्ट आहे ना मला टॅकल करता येते ते. की भांडण, वचावचा करणे चांगले आहे? यावर सोनालीने पुन्हा उत्तर दिले की, "मला असल्या घाणेरड्या गोष्टी शिकायच्याचं नाहीयेत. मी शांतपणे इथे बसले होते." विकास म्हणाला, ठमी स्वत:हून आलो सॉरी बोलायला. म्हणजे तसं सॉरी नाही."

आता या दोघांमधला हा वाद नेमका कशामुळे झाला ? या दोघांमध्ये कुणी पेटवली वादाची ठिणगी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share