पाहा Video : सलमान खान म्हणतो "ओ भाऊ जरा चावडीवर या"

By  
on  

बिग बॉस मराठीच्या मंचावर विविध पाहुणे येत असतात. मात्र यंदा एक असा पाहुणा येणारेय ज्याच्या येण्याने स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही आनंद होणार आहे. हा पाहुणा म्हणजे सुपरस्टार सलमान खान. सलमान खान लवकरच बिग बॉस मराठीच्या विकएन्ड स्पेशल एपिसोड म्हणजेच चावडीवर येणार आहे. याची घोषणा स्वत:सलमाननेच केली आहे.

नुकताच बिग बॉस मराठीच्या चावडीचा नवा प्रोमो समोर आलाय. या प्रोमोत सलमान खान चावडीवर येणार असल्याचं स्वत: सांगतोय. बॉलीवुडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा होस्ट सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांसह बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे. 

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रोमो मध्ये महेश मांजरेकर यांनी जाहीर केले, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत सलमान खानने देखील सांगितले की “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर” 

एवढच नाही तर या प्रोमोमधील सलमानच्या मराठी संभाषणाने तर आणखी रंगत आणलीय. सलमान म्हणतो की, "ओ भाऊ जरा चावडीवर या". एकीकडे चावडीवर बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर रंगत आणतात. त्यातच यंदाच्या चावडीवर सलमान येणार असल्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढेल यात शंका नाही.
 

Recommended

Loading...
Share