By  
on  

बिग बॉस मराठी 3 : चावडीवर गायत्री दातारची महेश मांजरेकरांनी घेतली शाळा

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांमध्ये कधी वाद होतील काही सांगता येत नाहीत. असाच वाद आहे सोनाली पाटील आणि गायत्री दातार मधील. नाश्त्याच्या मुद्द्यावरून सोनालीचं गायत्रीसोबत संभाषण झालं होतं. ज्यात सोनालीने बनवलेला नाश्ता वाया जात असल्याने तिने गायत्रीला ही गोष्ट सांगितली होती. ज्यावर गायत्रीने उडवा उडवीची उत्तरं दिली होती. त्यानंतर मात्र गायत्री तिच्या ग्रुपमध्ये सोनालीविरोधात बोलताना दिसली होती. याच मुद्द्यावरून महेश मांजरेकरांनी गायत्रीची शाळा घेतली आहे.

यावर गायत्री म्हणते की, "तिच्या हाताला सवय आहे जास्त बनवायची, त्यामुळे तिच्याकडून नाश्ता जास्त बनला" तर यावर महेश मांजरेकर म्हटले की, "तू बाहेर तिची वेगळीच शाळा लावलीस"

सोनाली चाऊ चाऊ करते असं गायत्री उत्कर्षला सांगताना दिसली होती. त्यामुळे महेश मांजरेकर यांनी गायत्रीची चावडीवर शाळा घेतली.

सोनालीच्या नाश्त्याच्या मुद्द्याला गायत्रीने वेगळं वळण दिल्याने महेश मांजरेकरांनी चावडीवर जाब विचारल. आगामी भागात चावडीवर ही चर्चा पाहायला मिळणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive