बिग बॉस मराठी 3 : विकासने मीराला कोपर मारल्याच्या मुद्द्यावर महेश मांजरेकर म्हटले "विकासने कोपर मारला नाही"

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात विविध टास्कदरम्यान वाद तर होतातच शिवाय हातापायी देखील अनेकदा होते. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये असच काहीसं पाहायला मिळालं. टास्कदरम्यान विकासने कोपर मारल्याचा आरोप मीरा जगन्नाथने केला होता. याच मुद्द्यावर बिग बॉस मराठीच्या चावडीवर चर्चा करण्यात आली.

बिग बॉस मराठीच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी मीरा जगन्नाथची चांगलीच शाळा घेतलीय. एका टास्कदरम्यान विकास आणि मीरा धावत असताना विकासचा कोपर मीराच्या पोटात लागल्याचा आरोप तिने विकासवर केला. यावेळी विकाने तिला गुच्चा मारलं नसल्याचं सांगूनही मीराने त्याचा मुद्दा केला होता. यावर महेश मांजरेकरांनी मीराला जाब विचारला.

विकासला महाराष्ट्रभर सिम्पथी मिळत असल्याचं महेश मांजरेकर यावेळी बोलले. विकासने कोपर मारला नसून मीरा आणि विकासचा हात एकमेकांमध्ये अडकला गेला असल्याचं महेश मांजरेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.

या मुद्द्यावरून महेश मांजरेकरांनी मीराला खडेबोल सुनावले.

Recommended

Loading...
Share