बिग बॉस मराठी 3 : विकास आणि सोनालीमध्ये गायत्रीवरुन होतेय चर्चा, म्हटले "तिला त्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलय"

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक दरदिवशी विविध विषयांवर चर्चा करतात. अशीच चर्चा सध्या गायत्री दातारविषयी सुरु आहे. ए ग्रुप म्हणजेच जय, उत्कर्ष आणि मीरा यांच्यासोबत पटत नसल्याने गायत्री या गटातून वेगळी झाल्याचं पाहायला मिळतय. तर दुसरीकडे गायत्री बी ग्रुप म्हणजेच विकास, विशाल, सोनाली आणि मिनल यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतेय. तेव्हा आता गायत्री दुसऱ्या ग्रुपमध्ये दाखल झाली का अशाही चर्चा सुरु आहेत. मात्र ए ग्रुप गायत्री विरोधात अनेक चर्चा करताना दिसत आहेत. टास्क दरम्यानही गायत्रीचे जय आणि मीरासोबत खटके उडताना दिसत आहेत. जय आणि मीरा अनेकदा गायत्रीविरोधात बोलताना दिसत आहेत.  तिने कसा विश्वासघात केला, कशी ती विकास आणि सोनालीच्या मागेपुढे करते आहे, बहुमत असतं तिकडेच खेळते या आणि अनेक गोष्टी ते बोलत आहेत.

अशात विकास पाटील आणि सोनाली यांच्या गायत्री विषयी चर्चा होताना दिसणार आहे. सोनाली यावेळी विकासला सांगते की, "जय मला म्हणत होता पहिल्यापासून तिला कसं खेळायचे हे आम्ही तिला गाईड करत आलो. तो त्याची बाजू मांडत होता. तर मी म्हटलं बरोबर आहे. पण मी तुला तेच सांगते तुमच्या दोघांबद्दल तिची काहीच तक्रार नाहीये. कशाला त्या मुलीबद्दल. आधीच पाण्यात बघतात तिला. लागलं आहे तिच्या हाताला त्या गोष्टीचं काहीचं नाही त्यांना." 

यावर विकास सोनालीला म्हणतो की, "पण तिला त्यांनी असं पूर्णत: वाळीत टाकल्यासारखचं केलं आहे. म्हणजे एक असतं ना की, आता काय ही जाणारच आहे, त्यामुळे काय आता आपल्याला उपयोग काही नाही त्यापध्दतीनेचं चालू आहे सगळं."


या सगळ्यात गायत्री तिचा खेळ कसा खेळणार. तिचाच ग्रुप तिच्या विरोधात असताना बी गटाची तिला साथ मिळेल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Recommended

Loading...
Share