बिग बॉस मराठी 3 : उत्कर्षने दिला जयला सल्ला, म्हटला “चुका मान्य कराव्याच लागतील”  

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरात आता आणखी काही सदस्यांची एन्ट्री होणार आहे. हे सदस्य दुसरे तिसरे कुणी नसून बिग बॉस मराठीतून घराबाहेर निघालेले सदस्य आहेत. यात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्यची एन्ट्री होणार आहे.

स्नेहा वाघने बिग बॉस मराठीच्या घरात येताच जयला खडे बोल सुनावले आहेत. स्नेहाच्या बोलण्याने जय मात्र दुखावला गेल्याचही पाहायला मिळेल. स्नेहा घरात येताच म्हटली की "या घरात सुरुवातीपासून माझ्यासोबत जो गेम खेळत होता तो फक्त जय दुधाणे होता". स्नेहाचं हे म्हणणं ऐकून जयला मात्र अश्रू अनावर झाले. त्यानंतर जय गार्डन एरियात एकटाच बसून रडताना दिसला. जे पाहुन उत्कर्ष आणि मीरा त्याच्याजवळ आले. यावेळी उत्कर्षने जयला सल्ला दिला. दोघही जयची समजुत काढताना दिसणार आहेत.


उत्कर्ष जयला म्हटला की, "खेळाच्या दृष्टीकोनातून ज्या काही चुका झाल्या त्या मान्य करायच्या. जे आपल्याला माहिती आहे की आपण केल्या त्या मान्यच केल्या पाहिजेत. पुढे कसं खेळायचं आहे आपल्याला माहिती आहे ना."तर पुढे मीरा म्हणते की, "हासुध्दा टास्कचं आहे. फरक पडून देऊ नकोस. उत्कर्ष म्हटला की, "हा टास्क आहे म्हणून तर खेळला गेला आहे.आता ही वेळ नाहीये लगेच जाऊन माफी मागायची. ती जरी म्हणाली तुम्ही मला बाहेर काढण्यासाठी  बोलत होतात..."

पुन्हा मीरा पुढे म्हणली की, "काहीचं एवढं नाही बोललो आपण. मी स्वत: कशी वाचेन ? कोण गेल्यावर वाचेन ? ही चर्चा झाली आहे."


 
यानंतर पुढे काय होईल ? जय आणि स्नेहाची पूर्वीची मैत्री पुन्हा पाहायला मिळेल का ? हे आगामी भागात समोर येईल.

Recommended

Loading...
Share