बिग बॉस मराठी 3 : जयने मागितली स्नेहा वाघची माफी, स्नेहाला दिलं हे वचन

By  
on  

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच तीन नव्या सदस्यांची एंट्री झाली आहे. तृप्ती देसाईंनी विशाल, मीरा, मीनल यांचे भरभरून कौतुक केले आणि लूझर हे लॉकेट सोनालीला दिले तर आदिशने देखील त्याला काय वाटते आहे ते सदस्यांना सांगून मीराला लूझर हे लॉकेट दिले. यात घरात स्नेहा वाघची देखील एन्ट्री झाली. स्नेहाचे वेगळेच रुप सगळ्यांना यावेळी पाहायला मिळाले. कोणता स्पर्धक कसा चुकतोय आणि कसा दिसतोय यावर तिने टिप्पणी केली. तर जय दुधाणेला स्नेहाने खडेबोल सुनावले आहेत.

स्नेहाच्या बोलण्याने जय मात्र दुखावला गेला. जय भावुक होऊन रडला शिवाय त्याने त्याच्या हाताला ईजा करून घेतली. या सगळ्यात स्नेहा त्याचं रडणही खोटं वाटू लागलं. स्नेहा याआधी जेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात होती तेव्हा जय आणि स्नेहाची चांगली मैत्री होती. मात्र स्नेहा घराबाहेर पडल्यावर तिने एपिसोड्स पाहिले आणि तिच्या लक्षात आलं की जयने तिचा वापर करुन घेतलाय. आणि म्हणूनच लूझरची माळ तिने जयच्या गळ्यात घातली. 

स्नेहा म्हटली की "या सगळ्यात तू एक मैत्रीण गमावून बसलास" तर जय त्याची बाजू मांडताना तो म्हटला की या गोष्ट मी नाही बोललो आणि काही गोष्टी मला बोलाव्या लागल्या, माझे दोन चेहरे नक्कीच आहेत."

मात्र या सगळ्यात जय आता स्नेहाची माफी मागताना दिसणार आहे. तिची समजुत काढताना दिसणार आहे. जय स्नेहाला म्हणतो की, "एक गोष्ट लक्षात ठेव जे काही केलं ते खरंच मनापासून केलं. माझा तुला हर्ट करायचा काही हेतू नव्हता, किंवा तुला खाली दाखवायचे, किंवा तुला बाहेर काढण्याचं. खरंच तुला जे वाटतं आहे ना जे काही तू बोललीस ते. खरचं सॉरी."

यावर स्नेहा म्हटली की "तुम्हांला वाटतं तुमचं चुकलं नाही तर सॉरी बोलून काय उपयोग आहे?" याला उत्तर म्हणून जय म्हटला की, "हे बंद खोलीत नाही नॅशनल टेलिव्हिजनवर मी सांगतोय."स्नेहाची माफी मागून जयने स्नेहाला वचन दिले की तो पुन्हा तिला त्रास देणार नाही. या सगळ्या प्रकारानंतर जय आणि स्नेहा यांच्यात पुन्हा मैत्री होणार का हे आगामी भागात समोर येईलच.
 
 

Recommended

Loading...
Share