By  
on  

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार शेवटचं एलिमिनेशन

बिग बॉस मराठी सिझन 3 च्या फिनालेसाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात 6 फायनलिस्ट पाहायला मिळत आहेत. यातच फिनालेच्या आठवड्यात एक एलिमिनेशन होणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आगामी भागात आठवड्याच्या मध्यातच एलिमिनेशन पाहायला मिळेल.

बिग बॉस मराठीच्या घरात होणारं हे एलिमिनेशन शेवटचं एलिमिनेशन असेल. महेश मांजरेकर हे कायम शनिवारी आणि रविवारी चावडीवर येत असतात. मात्र यंदा पहिल्यांदाच ते आठवड्याच्या मध्यात येऊन एलिमिनेशन पार पाडणार आहेत. 

 

तेव्हा कोणत्या स्पर्धकाचं एलिमिनेशन होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात विशाल निकम, विकास पाटील, मिनल शाह, जह दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि मीरा जगन्नाथ हे सहा टॉप फायनलिस्ट स्पर्धक आहेत. मात्र त्यात विशालकडे टिकीट टू फिनाले असल्यामुळे तो या एलिमिनेश पासून वाचणार आहे. तेव्हा विशालव्यतिरिक्त कोणात स्पर्धक फिनाले आधीच घराबाहेर जाईल हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे. येत्या 26 डिसेंबर रोजी बिग बॉस मराठी सिझन 3 चा फिनाले सोहळा रंगणार असून यंदाच्या सिझनचा विजेता किंवा विजेती कोण असेल हे समोर येईल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive