बिग बॉस मराठी 2: कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांची पुण्यात हवा

By  
on  

कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले हे बिग बॉस मराठीच्या घरातले एक वेगळं व्यक्तिमत्व. बिग बॉसच्या घरात सर्व जण एकमेकांवर आगपाखड करत असताना बिचुकले मात्र शांत डोक्यांड त्यांचा खेळ खेळत असतात. 

अशाच एका निवांत क्षणी बिचुकले आणि पराग कान्हेरे गप्पा मारत बसले होते. त्यावेळेस बिचुकले हे पुण्यात किती लोकप्रिय आहेत याबाबात हे दोघे बोलत बसलेले. बिचुकलेंना साताऱ्यात भेटायला लोकांची तर रांग लागत असेल असं पराग बिचूकलेंना कुतूहलाने म्हणाला. त्यावर बिचुकले म्हणाले,''साताऱ्यामध्ये नाही इतका पण पुण्यात मात्र मी खूप फेमस आहे.''

यापुढे ते म्हणाले,''एकदा काही कामासाठी पुण्यात गेलेलो. तेव्हा काही कामासाठी स्वारगेटच्या नटराज हॉटेलमध्ये राहिलेलो तेव्हा फार छान अनुभव आला मला. हॉटेलमध्ये मी आणि माझी मैत्रीण चहा पीत बसलेलो असताना २५-२७ वर्षांची दोन-तीन मुलं माझ्या टेबलाजवळ आले आणि विचारलं अभिजीत बिचुकले साहेब का तुम्ही साताऱ्याचे? आणि माझ्याकडे एक सेल्फी मागितला आणि सांगितलं की मी तुमचा फॅन आहे.''

''स्वारगेटला मला सगळे ओळखतात आणि सेल्फी मागतात माझ्याकडून'' असं बिचुकले म्हणताक्षणी पराग आश्चर्यचकित झाला. 

बिचूकलेंचं फॅन फॉलोइंग साताऱ्यात आणि पुण्यात किती आहे हे फक्त तिथे असलेल्या लोकांना माहीत. बिग बॉसमधील अशाच कधीही न पाहिलेल्या गोष्टी प्रेक्षकांना voot ऍप वर पाहता येतील. 

 

SOURCE: Voot

 

 

Recommended

Loading...
Share