By  
on  

बिग बॉस मराठी 2: साताऱ्याचे कंदी पेढे पुन्हा आले प्रकाशझोतात, बिचुकले आणि वीणामध्ये झाला वाद

बिग बॉसच्या घरात सतत या ना त्या कारणांमुळे स्पर्धकांमध्ये कुरबुरी सुरु असतात हे प्रेक्षकांना माहितीच आहे. अशाच एका कारणावरून बिचुकले आणि वीणामध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसच्या घरात वीकएंडचा डाव सुरु आहे. या डावात मांजरेकर स्पर्धकांची फिरकी घ्यायला आले आहेत. या आठवड्यात एलिमिनेशन प्रक्रिया सुद्धा पार पडणार आहे. या प्रक्रियेचा नारळ काल फुटला असून पराग कान्हेरे या आठवड्यात सुरक्षित झाला आहे. 

याच डावात बिचुकले आणि वीणामध्ये वाद झालेला दिसून येत आहे. महेश मांजरेकरांनी वीणाला पेढे खाऊन तोंड गोड करायला सांगितलं. परंतु ''बिचूकलेंनी पेढ्याला हात लावल्याने मी तो पेढा नाही घेणार'', असा आक्रमक पवित्रा वीणाने घेतला. 

वीणा असं बोलताच बिचुकले वीणावर भडकले.''साताऱ्याचे कंदी पेढे खायला औकात लागते. आणि हीची नाहीय ती. यांना वाटतं ना कि आपण मोठे स्टार वैगरे आहोत तर असे स्टार आम्ही घडवतो साताऱ्यात'' अशा परखड भाषेत बिचूकलेंनी वीणाला प्रत्युत्तर दिलं. 

आता बिचुकलेंच्या या उत्तरावर वीणा काय बोलणार आणि दोघांमधला हा वाद कोणत्या टोकाला जाणार हे बिग बॉसच्या आजच्या भागात कळून येईल. 

Recommended

PeepingMoon Exclusive